नागपूर : गिधाडांच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्राला सुरक्षित ठिकाण म्हणून घोषित करण्याची गरज असल्याचे आवाहन बीएनएचएसने (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) जागतिक गिधाड संवर्धन जनजागृती दिनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. जगभर सप्टेंबर महिन्याचा पहिला शनिवार जागतिक गिधाड संवर्धन जनजागृती दिवस म्हणून पाळला जातो.

महाराष्ट्रात एकेकाळी गिधाड पक्षी ग्रामीण भागात तसेच वनक्षेत्रात सहजपणे आढळून यायचे. मात्र, आज मेळघाट, पेंच व गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग वगळता महाराष्ट्रात गिधाड  दिसेनासे झाले आहेत. पुराणात संपाती आणि जटायु या दोन गिधाडांचा उल्लेख आहे.  म्हणून गिधाडांना अनेक धर्मामध्ये विशेष स्थान मिळाले आहे. गिधाडे मेलेल्या प्राण्यांवर जगतात, त्यामुळे त्यांना निसर्गचक्रामध्ये स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जाते. भारत सरकारने  २००६ साली डायक्लोफेनाक या औषधाच्या गुरांमधील वापरावर बंदी आणली.  परिणामी, गिधाडांची संख्या हळूहळू वाढत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या सखोल संशोधनात डायक्लोफेनाक सोबतच असेक्लोफेनाक, निमसुलाइड  व केटोप्रोफेन ही औषधेही गिधाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही औषधे टाळतानाच मेलोक्झिकम, टोल्फेनामिक अ‍ॅसिड या पर्यायी औषधांचा मात्र गिधाडांवर विपरीत परिणाम होत नसल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही पर्यायी औषधे वापरण्याचे दृष्टीने पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे संस्थेने म्हटले आहे. बीएनएचएसच्या मते, जागतिक गिधाड संवर्धन जनजागरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने तातडीने महाराष्ट्रास या पक्षासाठी सुरक्षित ठिकाण घोषित करणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाचे अधिकारी/ कर्मचारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी/ कर्मचारी यांनी गावस्तरावर बैठका घेऊन  डायक्लोफेनाक, असेक्लोफेनाक, निमसुलाइड व केटोप्रोफेन या औषधांचा कमीत कमी वापर कसा करता येईल यावर विचार करण्याची गरज आहे.

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…
first crop has entered the market increasing appeal of spicy papati in Uran
उरणच्या बाजारात वालाच्या शेंगा, वीकेंडला रुचकर पोपटीचे बेत
police lathicharge on citizens thronged in Kitadi forest area to see tiger
भंडारा : वाघ पाहण्याची उत्सुकता; तुफान गर्दी अन् पोलिसांवरच …
Public awareness board
पारव्यांना खायला टाकताय सावधान…! महापालिकेने उचलले हे पाऊल

बीएनएचएसने भारत सरकारच्या वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तसेच हरियाणा, मध्यप्रदेश, आसाम सरकारांच्या संयुक्त विद्यमाने गिधाड संशोधन व संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. यादरम्यान सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी गिधाडांच्या संख्येतील घसरणीमागील कारणांचा शोध घेतला. पाळीव गुरांना दिले जाणारे डायक्लोफेनाक हे वेदनाक्षामक औषध गुरांच्या मृत्यूनंतर त्यांना खाणाऱ्या गिधाडांच्या शरीरात जाते. त्यामुळे गिधाडांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या प्रजनानावर विपरीत परिणाम होत असल्याचे यातून समोर आले.

    – डॉ. बिवाश पांडव, संचालक, बीएनएचएस.

महाराष्ट्र शासन बदलत्या आधुनिक संशोधनाचा वापर विकासासाठी करण्यात सदैव अग्रेसर राहिले आहे. त्यामुळे गिधाडांच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक असणारे ही पावले शासन तातडीने उचलेल. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), सुनील लिमये, तसेच पशुसंवर्धन व वनविभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे.

    -किशोर रिठे, मानद सदस्य, बीएनएचएस.

Story img Loader