नागपूर: स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या (एसटी बँक) निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहिर झाला. त्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. निवडणूक निकाल जाहीर होऊन काही तास होत नाही तोच एसटीच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने मतदारांना नोटाचा पर्याय दिला नसल्याचा आक्षेप घेत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एसटी बँक निवडणूक निकालानंतर सोमवारी रात्री समाज माध्यमावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांना सादर केलेले निवेदन व्हायला झाले. त्यातील अर्जदार सेवानिवृत्त एसटी कर्मचारी प्रभाकर पी. गोपनारायण हे आहे. अर्जदारानुसार, एसटी बँकेची निवडणूक झाली असून मत पत्रिकेवर नोटाचा पर्यायच मतदारांना दिला गेला नाही.

हेही वाचा >>>‘एसटी बँक’ निवडणुकीत नागपूरची पाटी कोरीच! सर्व उमेदवार पराभूत

भारतीय राज्य घटनेच्या तरतुदीनुसार लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत नोटाचा मतदारांना अधिकार दिला जातो. या निवडणूकीत तो नसल्याने ही प्रक्रिया ‌अवैध असून ही निवडणूक रद्द करण्याची गरज आहे. या निवेदनाची प्रत एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक, सनियंत्रण समिती क्र. ३, नागपूर यांनाही ई- मेलवर पाठवली आहे. या विषयावर सदर प्रतिनिधीने एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधला असता या तक्रारीबाबतचे एक पत्र त्यांना आल्याचे मान्य केले.