देवेश गोंडाणे

नागपूर : चाळणी परीक्षा न घेता सरसकट अधिछात्रवृत्ती देण्याचा सपाटा बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांनी सुरू केला आहे. सारथीने चार वर्षांत २ हजार १३२, महाज्योतीने २ हजार ४२, तर बार्टीने १ हजार ४०२ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ दिला. यासाठी प्रतिविद्यार्थी महिन्याला ३५ ते ४० हजार रुपयांची अधिछात्रवृत्ती याप्रमाणे सरकारचा कोटय़वधींचा निधी खर्च होत असला तरी पीएच.डी.मुळे नोकरी मिळवणाऱ्यांची किंवा समाजहिताचे संशोधन करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘बार्टी’मधून अधिछात्रवृत्ती घेऊन पीएच.डी. करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचा संशोधन प्रबंधही संस्थेकडे जमा न केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Skill-based education is the door to development says Haribhau Bagde
कौशल्याधारित शिक्षणातूनच विकासाचे दार – हरिभाऊ बागडे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Superstition Eradication Committee to launch courses for public education against superstition
अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणासाठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
How to relieve discomfort in generation
अस्वस्थता रिचवायची आहे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०१२ मध्ये संशोधन अधिछात्रवृत्ती सुरू करण्यात आली. सुरुवातीला पाच संशोधकांनी या योजनेचा लाभ घेतला. दरवर्षी चाळणी परीक्षा आणि मुलाखती घेऊन बार्टीकडून संशोधन अधिछात्रवृत्ती दिली जात होती. यामध्ये मानधन व इतर खर्च दिला जातो. संशोधनाला वाव मिळावा, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नवनवीन विषयांवर संशोधन करावे हा योजनेचा उद्देश होता. मात्र, अधिछात्रवृत्ती घेऊन समाजहिताचे संशोधन केलेल्यांची संख्या फारच तोकडी आहे. बार्टीच्या धर्तीवर पुढे सुरू झालेल्या सारथी आणि महाज्योती या संस्थांनीही ही योजना सुरू केली. मात्र, चाळणी परीक्षा न घेता अर्जदार विद्यार्थ्यांच्या केवळ कागदपत्रांची तपासणी करून त्यांना थेट अधिछात्रवृत्ती लागू करण्यात आली. त्यामुळे चार वर्षांतच सारथीने २ हजार १३२ तर महाज्योतीने २ हजार ४२ विद्यार्थ्यांना या अधिछात्रवृत्तीचा लाभ दिला. त्यामुळे आता बार्टीकडे अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सरसकट लाभासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, सरसकट सर्वच अर्जदारांना लाभ देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

एकाच कुटुंबातील दोन ते तीन उमेदवार..

अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती बार्टीमधील एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे अधिछात्रवृत्ती हे संशोधनाचे माध्यम आहे की कुटुंबाच्या संगोपनाचे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.पीएच.डी.साठी पैसा आणि वेळही मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. विद्वानांना मदत करण्यासाठी भारतात अनेक संशोधन अधिछात्रवृत्ती योजना आहेत. मात्र, या योजना प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातात. त्यामुळे सारथी, महाज्योतीसारख्या संस्थांनी पण पीएच.डी.सारख्या कार्यक्रमांसाठी होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी; परंतु ती सरसकट न देता, प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारावर देणे अधिक योग्य ठरेल. – प्रा. डॉ. संजय खडक्कार, शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थ्यांच्या सरसकट अधिछात्रवृत्तीच्या विषयावर सामाजिक न्याय मंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. पीएच.डी. घेऊन नोकरी मिळते असे नाही. अधिछात्रवृत्ती द्यायलाच हवी. मात्र दर्जावाढीसाठी चाळणी परीक्षा असणे आवश्यक आहे. उर्वरित पैशांमधून विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी तयार करणे आवश्यक आहे. तशी योजना लवकरच येणार आहे. – सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग

Story img Loader