लोकसत्ता टीम

नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील ६६० मेगावॅटचा एक संच देखभाल, दुरुस्तीनिमित्त बंद असतानाच दुसरा संच ‘बॉयलर लिकेज’मुळे १७ ऑगस्टला बंद पडला. सहा दिवसानंतरही संच दुरुस्त झाला नाही. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. दुसरीकडे महानिर्मितीकडून बुधवारी (आज) संच कार्यान्वित होणार असल्याचा दावा होत आहे.

Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
Pimpri, Pimpri property under tax, Pimpri latest news,
पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार
eknath shinde
राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
major sector growth loksatta news
प्रमुख क्षेत्रांची वाढ सप्टेंबरमध्ये खुंटली! पायाभूत क्षेत्रांची वाढ सप्टेंबरमध्ये २ टक्क्यांवर मर्यादित

विदर्भासह राज्यात पावसामुळे सुरुवातीला विजेची मागणी २१ हजार मेगावॅट होती. ही मागणी घटल्याने महानिर्मितीने कोराडीतील ६६० मेगावॅटचा एक संच देखभाल दुरुस्तीला काढला. ही प्रक्रिया ४५ दिवसांची असते. हा संच बंद असतानाच १७ ऑगस्टला राज्यात विजेची मागणी २५ हजार मेगावॅटपर्यंत वाढली. त्यामुळे जास्त विजेची गरज असतानाच कोराडीतील ६६० मेगावॅटचा दुसरा संचही ‘बॉयलर लिकेज’मुळे बंद पडला. महानिर्मितीने उरन गॅस प्रकल्पासह जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवून तात्पुरती सोय केली. यावेळी ६६० मेगावॅटच्या एका संचाची दुरुस्ती दुसऱ्याच दिवशी करण्याचे संकेत दिले गेले. परंतु सहा दिवसानंतरही संच दुरुस्त झाला नाही. त्यातच राज्यात २२ ऑगस्टच्या दुपारी ३ वाजता विजेची मागणी आणखी वाढून २५ हजार ४२५ मेगावॅटवर गेली आहे.

आणखी वाचा-Talathi Exam: आरोपीकडे प्रश्नपत्रिकेची १८५ छायाचित्रे; तलाठी भरती गैरप्रकारप्रकरणी आंदोलनाचा परीक्षार्थीचा इशारा

पावसाचा खंड वाढल्यास ही मागणी आणखी वाढून विजेची नवीन समस्या उद्भवण्याचा धोका आहे. परंतु, महानिर्मितीने बुधवारपर्यंत एका संचाची दुरुस्ती करून ६६० मेगावॅटचा संच कार्यान्वित होऊन वीजनिर्मिती वाढणार असल्याचे सांगितले. तर महावितरणकडूनही गरजेनुसार विजेची सोय असल्याने विजेची समस्या उद्भवणार नसल्याचा दावा होत आहे. त्यामुळे किमान बुधवारी हा संच कार्यान्वित होणार काय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वीजनिर्मितीची सद्यस्थिती

राज्यात २२ ऑगस्टला दुपारी ३ वाजता विजेची मागणी २५ हजार ४२५ मेगावॅट होती. त्यापैकी राज्यात १५ हजार ९६८ मेगावॅट निर्मिती होत होती. ६ हजार २५५ मेगावॅट वीजनिर्मिती महानिर्मितीच्याकडून तर खासगीपैकी अदानीमध्ये २ हजार ५१३, जिंदलमध्ये ८७४, आयडियलमध्ये २६१, रतन इंडियामध्ये १ हजार ३१०, एसडब्ल्यूपीजीएलमध्ये ४५३ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ९ हजार २०९ मेगावॅट वीज मिळत होती, हे विशेष.