अमरावती : अधिक महिन्यात जावयाला सासुरवाडीला बोलावून वाण देण्याची प्रथा आहे. त्यासाठी चांदीचे नक्षीदार ग्लास, ताट-वाटी, समई, ताह्मण आदी वस्तूंना प्राधान्य मिळताना दिसते. या वस्तू खरेदीसाठी शहरातील सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची पावले वळताना दिसतात. सोबतच चांदीचे फॅन्सी जोडवे, इटालियन जोडव्यांना मागणी आहे.

१८ जुलैपासून अधिक महिना सुरू झाला. या महिन्यात जावई-मुलीला सोने, चांदीच्या स्वरूपात भेट दिली जाते. दीपदानाचे महत्त्व असल्याने तांबे किंवा चांदीचा दिवा भेट दिला जातो. मंदिरात तांब्याचे दिवे प्रज्वलित केले जातात. गृहिणी या काळात जोडव्यांमध्ये चांदीची भर टाकतात. त्यामुळे जोडव्यांचे नवनवीन डिझाइन्स बाजारात आले आहेत. ५ ते १०० ग्रॅम वजनापर्यंत ताट-वाटी, ग्लास या वस्तूंनासुद्धा मंगळसूत्र, अंगठी, कानातील टॉप्सची जोडवी उपलब्ध आहेत. अधिक मागणी आहे. ग्लास ३० ते १०० ग्रॅम, ताट खरेदी केली जाते. हिऱ्याचे मंगळसूत्र ३५ महिन्यात ३३ या संख्येला विशेष महत्त्व १०० ते ५०० ग्रॅम, फुलपात्र ३० ग्रॅम हजार रुपयांपासून पुढे तर हिरेजडित असल्याने तांब्याचे ३३ दिवे, ३३ अनारसे वजनापासून उपलब्ध आहे. काही अंगठी ६,९०० पासून आहे. इतरही दान स्वरूपात दिले जातात.

हेही वाचा – मरावे परी कीर्तिरुपी उरावे! मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन

हेही वाचा – मरावे परी कीर्तिरुपी उरावे! मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन

यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चांदीचा दर ७०, ६०० रुपये प्रती किलो होता. अवघ्या सात महिन्यांत हे दर ७८ हजारांवर पोहोचले आहेत. वाढलेली मागणी पाहता चांदीची दरवाढ कायम राहण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Story img Loader