वर्धा : गांधी, विनोबा यांच्या स्मृती स्थळांमुळे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटक वर्धेत येतात. येथे मध्य व दक्षिण रेल्वेच्या गाड्यांची सोय आहे. पण अनेक सुपर फास्ट गाड्या गावाला वळसा घालून न थांबता निघून जातात. ही बाब वर्धा एमआयडीसी उद्योजक संघटनेने हेरली. काही गाड्या थांबल्यास व्यापारी, पर्यटक तसेच उद्योजक मंडळीस दिल्ली व अन्य ठिकाणी जाणे सोयीचे ठरेल, अशी भावना या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी खासदार रामदास तडस यांना भेटून मांडली.
हेही वाचा – चंद्रपूर : ५५ वाघांना बेशुद्ध करून जेरबंद करणाऱ्या डॉक्टर व चमूबद्दल जाणून घ्या..
काही दिवसांत वंदे भारत ही नागपूर हैद्राबाद एक्स्प्रेस सुरू होणार आहे. तिचा थांबा सेवाग्राम स्थानकावर मिळावा, ही गाडी या पवित्र भूमीतून जावी, अशी इच्छा हिवरे यांनी दर्शविली. तसेच तामिळनाडू व आंध्र एक्स्प्रेस या दोन गाड्यांचा थांबा आवश्यक असल्याची बाब मांडण्यात आली. रेल्वेबाबत दक्ष असणाऱ्या खासदार तडस यांनी थेट रेल्वे मंत्र्यांना भेटून ही बाब लवकरच मार्गी लावतो, अशी हमी दिली आहे.