प्रेयसीचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन प्रेयसीला एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. बदनामी होऊ नये म्हणून प्रेयसीने चक्क आईचे जवळपास एक लाख रुपयांचे दागिने प्रियकराच्या स्वाधीन केले.आईने दिवाळीनिमित्त सोन्याच्या दागिन्याचा डबा खाली काढला असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी प्रियकराविरुद्ध खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील जिल्हा परिषदेत अधिकारी आहेत. आई गृहिणी असून तिला मोठा भाऊ आहे. तिचे ‘स्नँपचॅट’वर ‘अकाऊंट’ आहे. तिची कुणाल गणेश यादव (२७, रा. मानेवाडा रोड, अजनी) याच्याशी ओळख झाली. बेरोजगार आणि दारूडा असलेल्या कुणालने स्वत:ला विज्ञान शाखेचा पदवीधर असल्याचे रियाला सांगितले.
नागपूर : बदनामी होऊ नये म्हणून आईचे दागिने केले प्रियकराच्या स्वाधीन
प्रेयसीचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन प्रेयसीला एक लाख रुपये खंडणीची मागणी केली.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-10-2022 at 10:49 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demanded extortion from his girlfriend by threatening to circulate the obscene photograph on social media amy