यवतमाळ : देशाचे संविधान मुळीच बदलले जाणार नाही. विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केली. नेर येथे सामाजिक समता परिषदेसाठी आले असता, आज गुरुवारी यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. विरोधक चर्चा करण्याऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात. वेलमध्ये उतरून खासदारांनी घोषणाबाजी करणे चुकीचे आहे, असे आठवले म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे. संसद भवनाला संविधान सदन असे नाव देण्यात आले. त्यामुळे संविधान बदलण्याच्या गोष्टीत काहीही तथ्य नाही, असे ते म्हणाले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रालोआला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात, “जितेंद्र आव्हाड भांबावले आहेत, पागल…”

सर्वधर्माच्या लोकांचा आदर केला पाहिजे. हे भारतीय संविधानच सांगते. त्यामुळे राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यास आपण जाऊ. राम जन्मभूमीसाठी मुस्लीम समाजानेही सहकार्य केले. त्यांनाही पाच एकर जमीन देण्यात आली, याकडेही मंत्री आठवले यांनी लक्ष वेधले. यावेळी सुधाकर तायडे, महेंद मानकर, मोहन भोयर, अश्वजित शेळके, गोविंद मेश्राम, नवनीत महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – गडचिरोली : “तोडगट्टा आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करा”, नक्षल्यांचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा एकदा इशारा

जरांगे यांनी सरकारला अडचणीत आणू नये

मराठा समाजातील सर्वच लोक श्रीमंत नाही. त्यामुळे मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळावे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाही. जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Democracy is in danger because of the opposition criticism of union minister of state ramdas athawale at yavatmal nrp 78 ssb