नागपूर : बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे काम महामेट्रोने बुधवारी स.११ पासून सुरू केले असून प्रथम पुला लगतची झाडे कापणे सुरू केले आहे.पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.सर्वत्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.
महामेट्रोच्या माध्यमातून पुलाचे पाडकाम केले जात आहे.महामेट्रोने मेसर्स मॅट या कंपनीला पूल पाडण्याचे काम दिले आहे. त्यांची संपूर्ण यंत्रणा पुलाच्या स्थळी पोहोचली आहे.पूल पाडण्याचे कार्य फुटपाथ ब्रेकर प्रक्रियेद्वारे केले जाणार आहे, असे महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी यांनी सांगितले.