बुलढाणा: महावितरणमध्ये कार्यरत २८ हजार लाईनमन कर्मचाऱ्यांवरील प्रशासकीय अन्यायाच्या विरोधात विविध कामगार संघटना एकवटल्या आहे. यासाठी गठीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य वीज लाइनस्टाफ बचाव कृती समितीतर्फे आज निदर्शने करण्यात आली.
अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आयोजित या आंदोलनात विविध संघटनेचे पदाधिकारी व सभासद बहुसंख्येने सहभागी झाले.’लाईन मन’ कर्मकाऱ्यांचे कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे, कंत्राटी पध्दती ऐवजी सरळसेवा पध्दतीने भरती करावी, २० लिटर इंधन भत्ता, स्वतंत्र वेतन श्रेणी, सुरक्षित साधने व देखभाल साठी साहीत्य पुरवठा या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा… जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, वाहन जप्तीसाठी ‘ते’ आले अन् मग…
यामध्ये सय्यद जहीरोद्दीन, प्रविण पाटील, धर्मभुषण बागुल, एस.के. लोखंडे, पी.बी. उके, राजुअली मौला मुल्ला, श्रीकृषण खराटे, प्रभाकर लहाने, ललित शेवाळे, सुभाष बा-हे, आदिनाथ पवार, स्वप्नील सुर्यवंशी यांच्यासह समितीचे पदाधिकारी सहभागी झाले .