नागपूर : पावसाच्या अलगद पडणाऱ्या सरी आणि दाट धुक्यात हरवलेले चिखलदरा अनुभवायला पर्यटकांची पावले पावसाळा आणि हिवाळ्यात चिखलदऱ्याकडे वळतात. विदर्भाचे हे काश्मीर भर उन्हाळ्यात दाट धुक्यात हरवले आणि पर्यटकांची पावले आताच तिकडे वळायला लागली आहे.

अल्केश ठाकरे यांनी धुक्यात हरवलेला चिखलदरा अलगदपणे कॅमेऱ्यात टिपला. अवकाळी पावसामुळे दऱ्याखोऱ्यात वसलेले मेळघाट भर उन्हाळ्यात हिरवेगार झाले आहे. येथील दऱ्याखोऱ्यांवर हिरवाईची चादर पसरली आहे. त्यातही विदर्भाचे काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यातील वातावरणाने पर्यटकांना वेड लावले आहे.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
व्हिडीओ – अल्केश ठाकरे

हेही वाचा – यवतमाळ : मुसळधार पावसामुळे पूर; यवतमाळ-दारव्हा वाहतूक बंद

मेळघाट आणि चिखलदऱ्याचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळा आणि हिवाळा हे दोन उत्तम ऋतू. भर उन्हाळ्यातील अवकाळी पावसाने तीच स्थिती एप्रिलमध्ये निर्माण केली आणि दाट धुक्यात हरवलेले चिखलदरा अनुभवण्यासाठी पर्यटक तिकडे वळू लागले. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना हमखास चिखलदऱ्याची आठवण येते. सकाळी पडलेले धुके आणि त्या धुक्यातून वाट काढताना पर्यटक अक्षरश: हरखून जातात.

गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पावसाळ्याची स्थिती निर्माण केली आणि विदर्भाचे हे काश्मीर चांगलेच फुलले. दऱ्याखोऱ्यात वसलेले मेळघाट हिरवेगार झाले आहे आणि चिखलदरा हे पर्यटनस्थळदेखील धुक्यात हरवले आहे. मेळघाट आणि चिखलदऱ्यातील हिरवाई, बोचरी थंडी, दाट धुक्यात हरवलेली वाट पर्यटकांना आकर्षून घेण्यास पुरेशी आहे. सातपुडा पर्वतरांगेतील हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच खुणावत असते आणि आता तर भर उन्हाळ्यात ते पर्यटकांना खुणावत आहे.

हेही वाचा – धक्कादायक! मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करून फेकून दिले

चिखलदऱ्यातील हजारो फूट खोल दऱ्यातून वर येणारे धुके पाहण्यासाठी पर्यटक येथे वळत आहेत. अल्केश ठाकरे यांनी चिखलदऱ्याचे हे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपले आहे.

Story img Loader