नागपूर : २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नसल्याच्या आरोपात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी फडणवीस यांना दोषमुक्त केले आहे. या गुन्ह्यांचा परिणाम निवडणूकिवर पडेल असे ते न्हवते, तसेच त्यांनी कुठल्या हेतूने हे गुन्हे लपवले हे सिद्ध होत नसल्याने आरोपी फडणवीस यांना दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायाधीश एस. एस.  जाधव यांनी निकाल दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ५ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून आता शुक्रवार ८ सप्टेंबरला तो जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात ॲड. सतीश उके यांनी या प्रकरणात फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे.

हेही वाचा >>> फडणवीसांविरोधातील याचिकेचा निकाल उद्या; न्यायालय जो निर्णय…

दरम्यान, यापेक्षाही गंभीर गुन्ह्यांची नोंद प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. पण केवळ नजरचुकीने दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्याचे राहून गेले, असा युक्तिवाद फडणवीसांच्या वकिलांनी केला होता. आता न्यायालयाने निकालाची तारीख ८ सप्टेंबर ठरवली आहे. त्यानुसार फडणवीस यांच्या संदर्भातील खाजगी गुन्हे होते, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावी होईल असे नाही, त्यामुळे दोषमुक्त केले जात असल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.