लोकसत्ता टीम
चंद्रपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू पाणी देवून सोडल्यानंतर टोंगे आता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या… सलग २० दिवस उपोषण केल्यामुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. आता तुम्ही रुग्णालयात उपचार करा असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
आणखी वाचा-उपमुख्यमंत्र्यांसह भाजपाचे सर्व नेते गांधींच्या चरणी, कारण काय? वाचा…
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री परीनय फुके सकाळी १० वाजता उपोषण मंडपात दाखल झाले. यावेळी फडणवीस यांनी टोंगे यांची आस्थेने चौकशी केली. तुम्ही २० दिवसापासून ओबीसी समाजासाठी अन्नत्याग आंदोलन केले. तुम्ही समाजासाठी महत्त्वाचे आहात. तेव्हा आता तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता प्रकृतीकडे लक्ष द्या. सलग २० दिवस उपवास केल्याने तुमच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. आता प्रकृतीकडे लक्ष द्या. उपोषण सुटल्यानंतर सर्वप्रथम रुग्णालयात जावून आरोग्य तपासणी करून घ्या असा सल्ला फडणवीस यांनी टोंगे यांना दिला. त्यानंतर लागलीच टोंगे यांना रुग्णालयात नेण्यात आले व तिथे तपासणी करण्यात आली.