प्रमोद खडसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : यावर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझ्याक पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने मागील मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथे दिली. परंतु सोयाबीन काढणी संपण्याच्या मार्गावर असताना सरकार पंचनामे कसे करणार व मदत कधी मिळणार? यावरून शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.

भाजप ओबीसी जागर यात्रेचा समारोप तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १३ ऑक्टोंबर रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यावर्षी उशिराने पेरणी झाली. पावसाचा खंड पडला त्यातच मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवर पिवळा मोझ्याक पडल्याने पिके पिवळी पडली. परिणामी त्याचा परिणाम उत्पादनावर झाल्याने बळीराजा संकटात सापडला. त्यासाठी मदतीची मागणी देखील झाली.

आणखी वाचा-‘आकांक्षित’ गडचिरोलीत तब्बल ७०० पदे रिक्त; प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली, सरकारचे दुर्लक्ष

आता जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. मात्र असे असताना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवी येथे बोलताना म्हणाले की, पिवळा मोझ्याक मुळे झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत करण्याचा निर्णय मागील मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. परंतु आता सर्वत्र सोयाबीन काढणी सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. शेतात पिकेच नसतील तर पंचनामे करणार कसे आणि मदत देणार कशी. असा प्रश्न शेतकरी वर्गातून होत असून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

नुकसानीचा आकडा ३६ हजार हेक्टर ; पंचनामे कसे करणार ?

वाशीम जिल्ह्यात पिवळा मोझ्याक व चार्फुल रॉटमुळे ३६ हजार हेक्टर वरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले व तसा अहवाल कृषी विभागाकडून सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र पंचनामे करण्याचा आदेश उशीरा प्राप्त झाल्याने पंचनामे करण्याचा पेच निर्माण झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis announcement and farmers in confusion pbk 85 mrj
Show comments