लोकसत्ता टीम
नागपूर: काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा निवडणुकीदरम्यान भाजप प्रवेश घडेल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दिवाळीनिमित्त शनिवारी नागपुरातील देवगिरी येथे आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केले. आता काँग्रेसचेही काही नेते भाजपमध्ये येणार काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे काही नेते रांगेत आहेत. त्यांना निवडणुकी दरम्यान पक्षात घेतले जाईल.
आणखी वाचा-राज्यकर्ते जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात, मेधा पाटकर यांचा आरोप
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवर फडणवीस म्हणाले, तेथे यंदा महिला मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्यांचा कल भाजपकडे दिसतो. तेथील ४० मतदारसंघात जय- पराभव ५ हजार मतांच्या फरकाने असेल. हा तेथे सरकार निर्मितीसाठी महत्वाचा घटक ठरेल. मी लोकसभा निवडणूक लढणार नसून नागपुरातूनच विधानसभेची निवडणूक लढेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.