चंद्रपूर : सत्‍तेत परिवर्तन घडवून आणणारे, राज्‍याला हिरवेगार करणारे आणि चंद्रपूरचा चौफेर विकास साधणारे सुधीर मुनगंटीवार हे नेतृत्‍व-वक्‍तृत्‍व–कर्तृत्‍व याचा तिहेरी संगम असून त्‍यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील जनतेला केले.

महायुतीचे अधिकृत उमेदवार मुनगंटीवार यांनी मंगळवारी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी गांधी चौकात आयोजित करण्‍यात आलेल्‍या सभेला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत होते. या माध्यमातून महायुतीने एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मंचावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार हंसराज अहीर, खासदार रामदास तडस, आमदार संदीप धुर्वे, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार अशोक उईके, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार आशीष देशमुख, संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदन सिंग चंदेल, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शहराध्यक्ष राहुल पावडे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, अशोक जीवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर, राजीव कक्कड, रामपालसिंह तथा मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी व हजारो भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

हेही वाचा >>>‘प्रश्न विचारला तर मंत्री घरी बसा म्हणतात, विरोधक नसल्याने… ’; खासदार रामदास तडसांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ

चंद्रपूरची तोफ दिल्‍लीत धडाडणार

सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्‍यानिमित्‍ताने संपूर्ण देशातून त्‍यांना मानवंदना मिळवून दिली. इंग्रजांनी चोरून नेलेली ऐतिहासिक छत्रपतींची वाघनखे परत आणण्‍यासाठी धडपड केली. अशा अनेक अस्मितेच्या मानकांसंदर्भात त्‍यांनी उत्‍तम काम केले आहे. त्‍यांनी विकासाची गंगा आणून चंद्रपूरचा चेहेरामोहरा बदलला आहे. मुनगंटीवार यांच्या रूपाने चंद्रपूरची मुलुख मैदानी तोफ आतापर्यंत मुंबईत धडाडत होती आता ती दिल्‍लीत धडाडणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विकासाचे दुसरे नाव सुधीर मुनगंटीवार

ही राज्‍याची नाही तर देशाची निवडणूक असून देशाचा नेता कोण असेल, देशाचे नेतृत्‍व कोणाच्‍या हाती द्यायचे याचा निर्णय जनतेने घ्‍यायचा आहे. देशामध्‍ये नरेंद्र मोदींचे राज्‍य आणायचे की राहुल गांधींचे हे ठरवायचे आहे. देशाचा विकास करायचा असेल तर सर्व समाजाला जो सोबत घेऊन चालू शकतो, समाजाची दु:ख मांडू शकतो, अशा नेत्‍यालाच निवडून द्या. तसा नेता म्‍हणजे सुधीर मुनगंटीवार असून त्‍यांना ऐतिहासिक मतांनी निवडून देण्‍याचा निर्धार चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील जनतेने करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

हेही वाचा >>>देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई’

मुनगंटीवार राहणार ‘एक नंबर’वर

महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची सुरुवात कोठून करायची, यावर जेव्‍हा विचारमंथन झाले तेव्‍हा सर्वांनी एकमताने चंद्रपुरात मुनगंटवार यांचे नाव समोर केले. चांगली सुरुवात झाली आहे, शेवटही चांगलाच होईल. त्‍यामुळे मुनगंटीवार ‘एक नंबर’वर असून आता ‘अबकी बार ४०० पार’ करून मोदींना परत एकदा पंतप्रधान बनवून विकसित भारत निर्माण करण्‍याचा संकल्‍प करायचा आहे, असे उपमुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले.

ऐतिहासिक विजय प्राप्‍त करून द्या – बावनकुळे

सुधीर मुनगंटीवार यांना अर्थशास्‍त्र कळते, त्‍यांना महाराष्‍ट्राची नाळ कळते. आतापर्यंत हंसराज अहीर यांनी चंद्रपूरचा विकास केला, त्‍याच्‍या दहापट विकास करायचा असेल तर मुनगंटीवार हा एकमेव नेता आहे. सर्वांनी एकत्र येऊन मुनगंटीवार यांना ऐतिहासिक विजय प्राप्‍त करून द्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.