नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या मुंबईतील ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी भेट देऊ गणेश दर्शन घेतले. फडणवीस स्वतः गणेश भक्त आहेत. आमदार असताना पासून ते त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील विविध सार्वजनिक मंडळांना भेटी देतात. मुख्यमंत्री असताना ही त्यांनी ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. यंदाही त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. नागरिकांशी संपर्क साधला, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जनसंपर्काला महत्त्व प्राप्त झाले आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला फटका बसल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच दक्षिण- पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस सध्या इलेक्शन मोडवर आले आहेत. त्यांचे एक पाऊल नागपूर, मुंबई तर दुसरे पाऊल राज्याच्या अन्य भागांत असते. नागपुरात गत काही दिवसांपासून गणेश दर्शन मोहीम सुरू आहे. शनिवारी त्यांनी एका मंडळाला भेट दिली तेव्हा त्यांना ढोल वादनाचा मोह आवरला नाही. त्यांनी तेथे ढोल वादन केले. लक्ष्मीनगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली. तेथे त्यांनी मूर्तीसोबत सेल्फी काढला.

हे ही वाचा…अमरावती विभागात ‘आरटीई’च्‍या तब्‍बल ३४१६ जागा रिक्‍त ; शिक्षण विभागाच्‍या धरसोडीच्‍या धोरणामुळे विद्यार्थ्‍यांचे नुकसान

फडणवीस यांचा गणेशोत्सवातील भक्तिभाव नेहमीच चर्चेत येतो. गणेशोत्सवापूर्वी दोन महिन्यांतील त्यांचे नागपुरात अनेक दौरे झाले. मतदारसंघात त्यांच्या कामाचे होर्डिंग्ज झळकले. गणेशोत्सव मंडळांच्या विविध कार्यक्रम फलकांची भाऊगर्दी असतानाही शहरात त्यांच्या या नव्या फलकांची चर्चा आहे ती त्यावरील नाम बदलाची. देवेंदजींची जागा थेट ऐकरी ‘ देवाभाऊ’ ने घेतली आहे.

फडणवीस दरवर्षी गणेशोत्सवात विविध सार्वजनिक मंडळांना हमखास भेटी देतात. अनेक बडे नेते आणि मान्यवरांसह सर्वसामान्यांकडेही ते दर्शनासाठी आवर्जून जातात. आताही एकीकडे मुंबईत दुसरीकडे नागपूर असे त्यांचे दौरे सतत चालले आहेत. शुक्रवारी सायंकाळी लगोलग नागपूर गाठले. आल्यावर गणेशोत्सव मंडळांना भेटींचा कार्यक्रम सुरू झाला.राणी लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पांसोबत असा सेल्फी घेतला.

हे ही वाचा…आनंदवन परिसरात वाघिणीचा बछड्यासह वावर

पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी शनिवारी सकाळी ते मुंबईला गेले. सायंकाळी परत येताच त्यांनी पुन्हा भेटीगाठी सुरू केल्या. यंदा गणेशोत्सवापूर्वीही त्यांनी दक्षिण-पश्चिममधील मान्यवरांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. बुथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. मतदारसंघ व जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करताना राज्याच्या अन्य भागांतील राजकीय घडामोडींवरही त्यांचे लक्ष आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांशीही ते संवाद साधत आहेत . त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात भाजपने घरगुती गणेशमूर्ती स्पर्धेचेही आयोजन केले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री म्हणून आणि दुसरीकडे दक्षिण पश्चिमचे आमदार म्हणून त्यांनी काम सुरू केले आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister fadnavis arrived in nagpur friday took selfie at rani laxminagar ganeshotsav cwb 76 sud 02