अकोला: कृषी क्षेत्रात प्रगतीसोबतच आव्हाने वाढली आहेत. अनियमित पावसामुळे नैसर्गिक संकट ओढवते. वातावरणातील बदलाचे परिणाम समजून घेत संशोधन करण्याची खरी गरज आहे. त्यामध्ये कृषी विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. जलवायू परिवर्तनानुसार वाण विकसित केले पाहिजे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठात आयोजित ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष संध्या अढाऊ, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, आ.हरीश पिंपळे, आ.प्रकाश भारसाकळे, आ. अमोल मिटकरी, आ.विप्लव बाजोरिया, कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी उपस्थित होते.

transformer Failure Mahapareshan,
महापारेषणच्या ५० एमव्हीए रोहित्रात बिघाड, वसई विरारमधील वीज पुरवठ्यावर परिणाम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Health Marathwada, Health Care,
आरोग्याच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे
Supreme Court orders submission of report on Mhada building developers mumbai
पुनर्विकासातील सामान्यांच्या ‘म्हाडा’ सदनिका अद्याप विकासकांकडेच? सर्वोच्च न्यायालयाकडूनही अहवाल सादर करण्याचे आदेश
india s industrial production growth reached to 4 8 percent in july 2024
खाणकाम, निर्मिती क्षेत्रात मरगळ कायम; औद्योगिक उत्पादनाचा वेग जुलैमध्ये मंदावला
eco friendly development in navi mumbai city green building projects in navi mumbai
 नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन
pm narendra modi sets usd 500 billion target for electronics sector by 2030
इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी ५०० अब्ज डॉलरच्या टप्प्याचे लक्ष्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २०३० पर्यंतचे उद्दिष्ट 
Implementation of artificial intelligence based wildlife monitoring system virtual wall in Pench tiger project in Maharashtra
नागपूर : वन्यप्राण्यांना रोखणार ‘आभासी भिंत’; पेंचमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष…

हेही वाचा >>>पावसाने होणार नववर्षाचे स्वागत! वाचा, कुठे कुठे पडतील सरी…

पुढे बोलतांना ते म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारतात कृषिक्रांतीची सुरुवात केली. त्यांनी कृषिमंत्री असतांना राबवलेल्या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडले. भाऊसाहेबांनी विविध प्रकारचे प्रयोग केल्याने भारत अन्न-धान्यांत स्वयंपूर्ण झाला. विदर्भात शिक्षणाच्या क्षेत्रात भाऊसाहेबांनी मोठे कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षणाचा प्रचार-प्रसार झाला. शेतकरी सुशिक्षित होऊन त्यांना पारंपरिकसह कृषी क्षेत्रातील विज्ञानाची देखील जाण असावी. तरच शेतकरी समृद्ध होऊ शकेल, ही भाऊसाहेबांची भूमिका होती.

विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे शेतीची तुकडे पडत आहेत. शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता कमी झाली. अनियमित पावसामुळे नैसर्गिक संकट ओढवते. शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे झाले आहेत. वातावरणातील बदलाचे परिणाम समजून घेत वाण विकसित करण्याची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केल्याने उत्पादन वाढत आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवली, तर शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवता येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>>Intelligence Bureau Bharti: ‘आयबी’मध्ये तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, नोकरीची सुवर्णसंधी…

विविध योजनांचा लाभ अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने तरतूद केली जाते. प्रत्येक गावातील सहकारी संस्थांचे कृषी व्यवसायामध्ये परिवर्तीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सुविधा निर्माण होईल. शेतीसाठी १७ हजार मेगावॉट वीज द्यावी लागते. ती सर्व वीज येत्या तीन वर्षांत सौर ऊर्जाच्या माध्यमातून तयार केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळेल. आठ हजार कोटी रुपये विविध माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात आहेत. विदर्भ-मराठवाडा दूध प्रकल्प सुरू केला आहे. शेतकऱ्यांना दुधाचा जोडव्यवसाय देता आला पाहिजे, यासाठी निर्णय घेण्यात आला, असे फडणवीसांनी नमूद केले.

शेतकरी आत्मनिर्भर होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करावे लागतील. शासन पाठीशी उभा राहील. त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका कृषी विद्यापीठांची राहणार आहे. नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात आले आहे. उत्पादकता वाढण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल. पुढील टप्प्यात विषमुक्त शेती केली जाईल, असे फडणवीसांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.