नागपूर : भाजप आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी आहेत.. त्यांच्या वक्तव्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो, नारायण राणे आणि मी त्यांच्याशी चर्चा केली केली असून त्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या विशिष्ट धर्माच्या विरोधी वक्तव्यामुळे चर्चेत आहे. विविध संघटनांनी राणे यांचा निषेधही केला आहे. बुलढाणाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राणे यांचे याबाबत कान टोचले. यासंदर्भात फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, नितेश राणे यांच्याशी त्याचेवडील नारायण राणे आणि मी सुद्धा बोललेलो आहे. त्यांना असे वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे. यापुढे ते कळजी घेतील.

हे ही वाचा…नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपाच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांना कुणाशी द्यावी लागेल लढत?

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अभ्यास करून बोलले पाहिजे. उद्योग बाहेर गेला नाही, असा त्या कंपनीनेच खुलासा केला आहे. त्यामुळे ते तोंडावर पडले आहे. बातमी आली म्हणून लगेच माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची, हे आता त्यांनी बंद केले पाहिजे. कुठलीही माहिती न घेता , केवळ वर्तमान पत्राच्या बातमीवर वक्तव्य करणे योग्य नाही असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.

हे ही वाचा…बुलढाणा : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, ‘लाडकी बहीण कायम ठेवायची असेल तर युतीला निवडून द्या’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी सुद्धा दौऱ्यावर आलेले आहे. विश्वकर्मा योजनेचे संमेलन वर्ध्यात होत आहे. यानंतर सुद्धा अनेक दौरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात होतील. असेही फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोणाकडे तक्रार केली याबद्दल माहिती नाही असेही फडणवीस म्हणाले. लाडली बहीण योजनेसाठी आधीच अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. त्यासाठी कोणत्याही योजनेला धक्का लावला नाही आणि तडजोड केली नाही असेही फडणवीस म्हणाले. .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm devendra fadnavis advised to nitish rane to avoid controversial statements vmb 67 sud 02