मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे यांची चार चाकी गाडीतून सिनेस्टाईल अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना जऊलका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंज परिसरात१८ फेब्रुवारी रोजी भर दिवसा दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी चार संशयीत आरोपींना अटक केली असून दोघांचा तपास सुरू आहे.
हेही वाचा >>> गडचिरोली : बकरीला वाचवण्यासाठी तो थेट बिबट्याशीच भिडला पण…
मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही रस्त्यावर बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे हे १८ फेब्रुवारी रोजी राजाकिन्ही येथे दवाखान्यात उपाचार्थ गेले असता त्यांचे चारचाकी गाडी क्रमांक एम एच ४७ एन ०४३९ या वाहनातून भर दुपारी सिनेस्टाईलअपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची तक्रार मृतक विश्वास कांबळे यांच्या पत्नी लीलाबाई विश्वनाथ कांबळे यांनी पोलिसात दाखल केली आहे. विश्वास कांबळे यांचे अपहरण करून त्यांना बेशुद्ध अवस्थेत गुंज फाट्यावर सोडून आरोपी पसार झाले.
हेही वाचा >>> धक्कादायक! अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; तक्रारीनंतर तरुणाविरुद्ध गुन्हा
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांनी दिली. राजा किन्ही हे वर्दळीचे गाव असून भर दुपारी अपहरण करून खून झाल्याने या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.