नागपूर : केंद्रशासीत प्रदेश, सर्व राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट तपास यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार देण्यात येतो. नागपूर शहर पोलीस दलात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक रेखा सागर संकपाळ यांना या वर्षीचे सर्वोत्कृष्ट तपासासाठी हे पदक जाहीर झाले. त्यांनी बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर राज्यातील पहिला मकोका गुन्हा दाखल केला होता. बाळविक्री प्रकरणी ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी तब्बल १० टोळ्यांचा उलगडा करीत ९१ आरोपींवर गुन्हा दाखल केला होता, हे विशेष.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक राज्यातील पोलीस आणि अन्य तपास यंत्रणांकडून सर्वोत्कृष्ट तपास आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात येते. प्रत्येक राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना यामध्ये सहभागी करण्यात येते. केंद्रीय दक्षता पदक पुरस्कारासाठी देशभरातून हजारो नामांकन केले जाते. त्यामधून सर्वोत्कृष्ट गुन्हे तपासासाठी केंद्रीय दक्षता पदक पुरस्कार जाहीर करण्यात येतो. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे सीआयडी विभागात पोलीस उपाधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या रेखा संकपाळ यांच्यासह पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील पंकज चक्रे यांचा समावेश आहे. यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील तब्बल ३० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षता पदके मिळाली आहेत. त्यामध्ये पोलीस उपाधीक्षक रेखा संकपाळ यांच्यासह पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहायक निरीक्षक सिध्देश जोष्टे, उपनिरीक्षक राधिका भावसार, पोलीस निरीक्षक समीर लोणकर, सहायक निरीक्षक मनोज चौधरी, सहायक निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक निरीक्षक उमेश बोरसे आण सहायक निरीक्षक ऋषिकेश रवाळे यांचाही पदकांच्या यादीत समावेश आहे.

हेही वाचा >>>विमानात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी, देणारा जगदीश उईके पोलिसांच्या ताब्यात

‘लोकसत्ता’च्या वृत्तमालिकेनंतर बाळविक्री करणाऱ्या टोळीचा उलगडा

बाळ विक्री करणाऱ्या टोळ्यांचे मुख्य केंद्र म्हणून नागपूर शहराची ओळख निर्माण झाली होती. ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम बाळविक्री करणाऱ्या टोळ्या नागपुरात सक्रीय झाल्याची वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यानंतर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या (एएचटीयू) पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी वृत्ताची गांभीर्याने दखल घेऊन तब्बल १० टोळ्यांचा उलगडा केला. बाळ विक्री करणाऱ्या ९१ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर पीआय संकपाळ यांनी राज्यातील पहिला मकोका गुन्हा दाखल केला, हे विशेष. याच तपासासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे केंद्रीय दक्षता पदक पुरस्कार मिळाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy superintendent of police rekha sankpal awarded central home minister vigilance medal nagpur news adk 83 amy