नागपूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत असून त्यांनी मंगळवारी ठाणे शहरातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत २०२४ मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय, असा प्रश्न विचारला. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतले. त्यावर त्यासाठी कामाला लागा, अशी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – बुलडाणा : तलाठी अहिर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पटवारी संघाचे धरणे

हेही वाचा – वर्धा : ऑनलाईन कामे करणार नाही म्हणत ठिय्या आंदोलन सुरू

आता या मुद्यांवरून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख आणि भाजपामध्ये पुर्नप्रवेश घेतलेले माजी आमदार आशिष देशमुख हे काका-पुतणे परस्परांवर (ट्विटर) भिडले. बावनकुळे यांना उद्देशून अनिल देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आधी आमदार व्हावे लागेल. तुमच्याच पक्षाचे लोक नागपूरमध्ये निवडणुकीची वाट पाहत आहेत. यावर आशिष देशमुख यांनी प्रतिउत्तर दिले. “देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नका. ते पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील. २०१४ मध्ये तुमचा दारुण पराभव मीच केला होता. २०१९ मध्ये मी लढलो असतो तर तुमची काय गत झाली असती? आता २०२४ मध्ये तुमचा पक्ष खरच तुम्हाला उमेदवारी देणार आहे की तुमच्या मुलाला हे आधी शरद पवार यांना विचारा”, असा टोलाही काकांना लगावला.