नागपूर: मैत्रीला जात- धर्म नसतो. नागपुरात दंगल आणि हिंसाचार झाल्यावरही या भागातील हिंदू- मुस्लिम मित्रांमध्ये एकोपा कायम असल्याचे सकारात्मक चित्र पुढे येत आहे. गीतांजली चौक परिसरात आजू- बाजूला दुकान असलेल्या सैय्यद तौफिक आणि मुकेश गंगोत्री या दोघा मित्रांनी घटनेच्या दिवशी एकी दाखवत कश्या प्रकारे एक- मेकांना मदत केली. सोबत नेमके काय घडले याबाबत माध्यमांना सांगितले.
दोघे पुढे म्हणाले, आमचे गेल्या ३५ वर्षांपासून आजू- बाजूला दुकान आहे. दोघांच्याही कुटुंबिय चांगले असून आमच्यात एकोपा आहे. आम्ही नेहमीच एक- दुस्यांच्या सुख- दुखत सोबत असतो. पुढेही राहू. दंगल घडलेल्या घटनेच्या दिवशी आमच्या गल्लीत शिरलेल्या असामाजिक तत्त्वांनी हिंदू- मुस्लिम काहीही न बघता मिळेल ते वाहन तोडणे, घरात सुलीरण्याचा प्रयत्न करणेचा प्रयत्न केला. मस्जितवरही दगडफेक केली गेली. हा सुनियोजित कट दिसत होता. आमच्या सी. सी. टीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. हिंसाचार घडवणारे तोंफावर रुमाल व हेल्मेट घालून होते. ते लक्ष करून हल्ला करत होते. जमावमध्ये स्थानिक कुणी दिसत नव्हते. सर्व चेहरे नवीन दिसत असल्याचेही दोघांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे उपद्रव करणारे कोणत्याही धर्माचे नसून सर्व धर्मियांनी एकोपणे राहण्याचा सल्लाही समाजाला दिला.
दोन पोलिसांना घरी घेऊन वाचवले…
असामाजिक तत्वांचा धिंगाणा सुरू झाल्यावर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. दोघांना लगेच घरी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांना प्रथमोपचार दिला. दरम्यान येथे एका पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी पेटवण्यात आली असल्याचेही दोघांनी सांगितले.
प्रकरण काय?
नागपुरातील महाल परिसरात एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद करण्यात आले.