नागपूर: शहरातील विद्यमान भुयारी मार्गाचा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष उपयोग होत नसल्याचे दिसून आल्यावरही आता पुन्हा मॉरिस कॉलेज जवळ नवीन भुयारी मार्ग बांधण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी ८० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले असून महामेट्रो हे काम करणार आहे.

मॉरिस कॉलेज चौकाजवळ सकाळी आणि सायंकाळनंतर रोज प्रचंड वाहन कोंडी होते. सदर – मानकापूर भागातून येणारी व बर्डीकडे जाणारी तसेच रेल्वे स्थानक, कॉटन मार्केटकडे जाणा-या वाहनांची येथे गर्दी होते. ही कोंडी फोडण्यासाठी झिरोमाईल्स- मॉरिस कॉलेज जवळून भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. आता त्याला मूर्त रूप येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… रविकांत तुपकरांचा ‘स्वाभिमान’ दुखावला! शिस्तपालन समितीसमोर जाणार नाही; म्हणाले, “आता निर्णय…”

गडकरींनी केंद्रीय रस्ते विकास निधीतून या कामासाठी ८० कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यांनी हा निधी महामेट्रोकडे वळता केला आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या मनीषनगर, आनंद टॉकीज, कॉटन मार्केटमध्ये महामेट्रोनेच बांधलेले भुयारी मार्ग वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष उपयोगी ठरले नाही. त्यामुळे हा नवा भुयारी मार्ग कितपत उपयोगी ठरेल याबाबत साशंकता आहे.

Story img Loader