वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पने वेढलेल्या गरमसूर गाव भितीच्या सावटात जगत असल्याची स्थिती आहे. या परिसरात बारा वाघ असल्याची नोंद झाली आहे. गावात प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती असून बहुतांश शेतीवर अवलंबून आहेत. त्यातच वनविभागाचे कडक नियम असल्याने सत्तर टक्के जमीन पडीक आहे. परंतु वाघाचे हल्ले या शेतकऱ्यांचा जीव नकोसा करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिबट तसेच अन्य हिंस्त्र प्राण्याची धास्ती आहेच. गत आठवड्यात शंकर वरठी यांच्यावर वाघाने हल्ला केल्याने ते जखमी झाले. कसाबसा त्यांनी जीव वाचविला. सेवानिवृत्त वन मजूर रामजी नागोसे हे पण जखमी झाले. या वाघ प्रकल्पात आजवर तेरा लोकांचा बळी गेला आहे. या भितीदायी परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी गावकरी सातत्याने पुनर्वसन करण्याची मागणी करीत आहे. त्याची दखल घेत या भागाचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शासनदारी ही समस्या लावून धरली. नवरगाव प्रमाणेच गरमसूर या गावाचे पुनर्वसन करण्याचा पाठपुरावा करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत बोर प्रकल्पाच्या कोअर झोनमधील गरमसूर गावाचे पुनर्वसन तसेच स्थलांतर करण्याबाबत अध्यादेश व अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यात लक्ष घालून सूचना केल्यात. तसेच आदेश वनखात्याच्या प्रधान सचिवांना दिले. मात्र प्रशासन ढीम्म. अद्याप पुनर्वसनाचे चाक रुतून बसले आहे.

हेही वाचा – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तृतीयपंथींची गुंडागर्दी !

हेही वाचा – देशात ‘स्नो लेपर्ड’ची संख्या ७१८; पहिला अहवाल जाहीर

डॉ. पंकज भोयर म्हणतात की, येथील गावकऱ्यांना रोज जीव मुठीत घेऊन जगावे लागते. म्हणून ही समस्या त्वरित निकाली निघणे आवश्यक ठरते. पण लालफीतशाहीत प्रकरण अडकून पडल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite the loss of 13 farmers there is no rehabilitation of garamsur village pmd 64 ssb