लोकसत्ता टीम

नागपूर: शासनाच्या नव्या धोरणानुसार सरकारच वाळू उपलब्ध करून देणार, अशी घोषणा करण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातून वाळूची अवैध वाहतूक सुरूच असल्याने शासनाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!

नागपूर जिल्ह्यात रामटेक पोलिसांनी परवाना नसताना वाळू नेणारा टिप्पर पकडला. अशीच कारवाई मौदा पोलिसांनीही केली आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या धोरणानंतरही अवैध वाहतुकीवर पायबंद बसला नसल्याचे स्पष्ट होते. रामटेक -तुमसर मार्गावर विना परवाना वाळू नेणारा टिप्पर पोलिसांनी पकडला. या भागात वाळू चोरी सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली व टिप्पर जप्त केला.

आणखी वाचा-‘ओटीपी-पासवर्ड’ दिला नाही, तरी गमावले सव्‍वा लाख रुपये

सध्या नागपूरमध्ये मोठ्या संख्येत बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारी वाळू इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून आणली जात आहे व शहरात चढ्या दरात ती विकली जात आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या धोरणानुसार स्वस्त: दरात वाळू देण्याची घोषणा प्रत्यक्षात कृतीत उतरल्याचे सध्या तरी दिसून येत नाही.

फडणवीसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

नागपूर जिल्ह्यात वाळू घाटाचे लिलाव झाले नसतानाही इतर छुप्या पद्धतीने उत्खनन सुरू आहे. इतर राज्यातूनही चोरट्या मार्गाने किंवा बनावट परवाना तयार करून वाळू आणली जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळूचा काळाबाजार होऊ देणार नाही, असे स्पष्ट केल्यावरही हा प्रकार सर्रास सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले.