लोकसत्ता टीम
वर्धा : उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त करीत वर्ध्यातून निष्ठा यात्रा निघाली. ८६४ किलोमीटरचे अंतर नऊ दिवसात पूर्ण करीत ३१ डिसेंबरला मुंबईत मातोश्रीवर यात्रा पोहचणार, असे युवा परिवर्तन संघटनेचे निहाल पांडे यांनी सांगितले.
आणखी वाचा-धक्कादायक! ४८ हजारांची लाच; महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन वासेकर ‘एसीबी’च्या जाळ्यात
उध्दव ठाकरे यांना कपट करीत मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात आले. त्यानंतर फुटी पडल्या. मात्र आम्ही ठाकरे यांनाच समर्थन देणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई, शेतकरी समस्या, घरकुल, आरोग्य, जर्जर उद्योग, याकडे लक्ष वेधलं जाणार आहे. वाटेतील प्रत्येक प्रमुख गावात कॉर्नर सभा घेतल्या जाणार आहे. या निष्ठा यात्रेत संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.