वाशीम : पाणी आणि माशांचे अतूट नाते आहे. पाण्याविना मासा जगूच शकत नाहीत. जर पाणी आटले तर माशांचे काय ? असा गंभीर प्रश्न उभा राहतो. शहरातील देव तलाव देखील कोरडा पडल्याने शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे.

मे महिना म्हणजे कडक उन्हाळ्याचे दिवस त्यातच जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वाढत्या उन्हाचा झळा मनुष्याप्रमाणेच वन्यजीवांनाही असह्य होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे शहरातील देव तलावातील पाणी आटले आहे.

हेही वाचा…विद्यापीठाने ‘काही’ परीक्षांच्या तारखांमध्ये केला बदल, जाणून घ्या सविस्तर…

परिणामी, पाण्याअभावी हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असले लहान, मोठे तलाव आणि धरणांनीही तळ गाठायला सुरवात केली आहे. देव तलावातील पाणी आटल्याने उरलेल्या फक्त दोन कुंडामध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक असल्याने मासे असले तरी त्या देखील धोक्यात आलेल्या आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी आटत चालले असून माशांचा सहवास आहे. अशा ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Story img Loader