नागपूर: उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऑनलाईन सहभाग असलेली जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक शुक्रवारी केवळ झटपट आटोपण्यात आली. दहा मिनिट चाललेल्या या बैठकीत ९९८ कोटींचा विकास कामांचा आराखडा सादर करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचारसंहिता असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीने डीपीसीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पार पडली. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून ऑनलाइन सहभागी झाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील खर्चासोबत वर्ष २०२३-२४ च्या नवीन आराखड्याशी संबंधित माहिती सादर केली तसेच २०२३-२४ साठी ९९८ कोटींचा आराखडा सादर केला.त्यानंतर कुठल्याही चर्चेविणा बैठक संपली. दरम्यान आचारसंहिता संपल्यावर फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक होण्याची शक्यता असून त्यात नियोजन समितीचा निधी निश्चित केला जाईल.