चंद्रपूर: चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. येथे अनेक उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगांना पुरक असे नवे उद्योग या जिल्ह्यात उभे राहू शकतात ही बाब लक्षात घेत येथील उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी व्यावसायिक विमाने उतरण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील इतरही प्रश्नांबाबत आमदार जोरगेवार यांची नार्वेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

Chandrapur , Bus Tap Karo,
चंद्रपूरच्या ध्येयवेड्या तरुणांनी स्थापन केली ‘बस टॅप करो’ कंपनी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…

हेही वाचा – नागपूर : हवाई सुंदरीवर हॉटेलमध्ये बलात्कार; ‘न्यूड फोटो’ प्रसारित…

चंद्रपूर हा औद्यागिक जिल्हा असून मोठे वीज निर्मिती प्रकल्प, कोळसा खाणी, लोहखनिज, सिमेंट उद्योग, कागदउद्योग, आयुध निर्माण प्रकल्प, वनसंपत्ती, पर्यटन असे अनेक उद्योग चंद्रपूर येथे आहे. यामुळे या क्षेत्रात अजून नवीन उद्योग आणि कारखाने उभारण्याची क्षमता आहे. या सर्व उद्योगांचे संचालन आणि नियमन मुंबई, नागपूर, दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद, रायपूर या सारख्या शहरांमधून होत असते. चंद्रपूर व गडचिरोली सारख्या मागास क्षेत्राला जोडण्याकरिता शासनाच्या वतीने १९६७ ला मोरवा या ठिकाणी २२ हेक्टर जागेत विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने विमान धावपट्टी विकसित करण्यात आली. सदर विमानतळाची धावपट्टीची लांबी ९०० मीटर व रुंदी २८ मीटर इतकी आहे. त्यामुळे सदर विमानतळ केवळ छोटेखानी विमान उतरण्यासाठी योग्य आहे. तसेच सद्यस्थितीत सदर विमानतळाचा वापर केवळ व्हीआयपीच्या हालचालींसाठी केला जातो. मात्र आता सदर विमान धावपट्टी व्यावसायिक विमान चलनच्या दृष्टीने विकसित केल्यास या विमानतळाचा वापर अधिक योग्य रीतीने केल्या जाऊ शकतो. तसेच नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याकरिता सद्यस्थितीत केवळ हे एकच विमानतळ आहे.

हेही वाचा – आता भाजपा आमदाराची संघटनाच करणार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ आहेत मागण्या

मोरवा येथील धावपट्टीचा विकास आराखड्यानुसार व्यवसायिक विमान चालवण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला व्यवसायिकदृष्ट्या विमानसेवेने जोडण्यासाठी व येथे नवीन रोजगार निर्मितीसाठी मोरवा, चंद्रपूर विमानतळाच्या धावपट्टीचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

Story img Loader