अकोला : उच्च पोषणयुक्त ज्वारी पीक वाण विकसित केल्याने राष्ट्रीय कार्यशाळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राला उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले. या संशोधन केंद्राला हा सन्मान तब्बल तिसऱ्यांदा मिळाला. यापूर्वी सन २०२३ व सन २०२१ ला सुद्धा केंद्राला गौरविण्यात आलेले आहे.

ज्वारीसह इतर तृणधान्य पिकांचे क्षेत्र घटत आहे. आता ज्वारी पिकाला चांगला दर व मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे वळण्याची गरज आहे. ज्वारी पिकावर अनेक वर्षे काम करून वैविध्यपूर्ण पीक वाणांची निर्मिती साधणारे ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वात अकोला कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्याने अधिक गती घेतली.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

हेही वाचा – भाजपाची ‘महाविजय २०२४’ कार्यशाळा सुरू, राज्यभरातील महत्त्वाचे नेते हजर

हैदराबाद येथे ९८ वार्षिक कार्यशाळेत अकोला ज्वारी संशोधन केंद्र यांना ज्वारी संशोधनात केलेल्या भरीव उत्कृष्ट संशोधनाबद्दल उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. संशोधन केंद्राने आतापर्यंत १६ ज्वारीच्या वाणांची निर्मिती केली असून त्यापैकी सहा वाण हे राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झाले.

या केंद्राची ज्वारीचे २० जणूके हे ‘राष्ट्रीय पादप अनुवंशिक संशोधन ब्युरो’ येथे नोंदणीकृत आहेत. या केंद्राच्या ज्वारी लागवडी संबंधी व पीक संरक्षणासंबंधी अनेक शिफारसी राष्ट्रीय स्तरावर स्वीकृत झाल्या आहेत. केंद्राने वाशीम येथे अतिप्राचीन व दुर्मीळ ज्वारीच्या २५ हजारांहून अधिक जणुकांची लागवड करून त्यांचे उत्तम संगोपन केले. अतिशय अवघड आणि देशातील पहिलाच प्रयत्न विद्यापीठाने नुकताच साधला.

या प्रयोगासह ज्वारी पिकाच्या विविध जातींचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्वारी तथा तृणधान्य वर्गीय पिकांचे शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांनी येथे भेटी दिल्या आहेत. कुठल्याही पिकात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर जननद्रव्ये चाचणीचा कार्यक्रम देशात प्रथमच झाला. या आगळावेगळ्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर जननद्रव्ये तपासणीचा विक्रम म्हणून नोंदसुद्धा झाली आहे.

ज्वारीचे नवीन एसपीव्ही २६२० वाण

ज्वारीमधील पोषण मूल्य वृद्धीचा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असून या केंद्राने भरीव कामगिरी केली. जस्त लोह व प्रथिने अधिक प्रमाणात असणारा पिवळ्या ज्वारीचा नवीन वाण एसपीव्ही २६२० हा राष्ट्रीय पातळीवर प्रसारणासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ३१.६ पीपीएम लोह, २४.४ पीपीएम जस्त व ११.९ टक्के प्रथिने आहेत. राष्ट्रीय पातळीवरील ज्वारीमधील पोषण मूल्यवृद्धीसाठीचा हा वाण संपूर्ण देशात वापरला जाईल.

हेही वाचा – भंडारा: हुंड्यासाठी सासरच्यांकडून नववधूवर अत्याचार; नवविवाहितेच्या आईची पोलिसांत तक्रार

कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. रामेश्वर घोराडे यांचे अनुभवी आणि कृतीयुक्त नेतृत्वात कामगिरीत सातत्य ठेवत ज्वारीच्या पिक वाणांची निर्मिती तर केलीच, शिवाय राष्ट्रीय स्तरावर तब्बल तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून सिद्ध होत विद्यापीठाला सन्मान प्राप्त करून दिला आहे. नव्यानेच राष्ट्रीय स्तरावर प्रसारित उच्च पोषणयुक्त ज्वारी पिक वाण देशपातळीवर सर्वाधिक लोकप्रिय होईल, याचा विश्वास आहे. – डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.