चंद्रपूर : ‘अमृत भारत स्टेशन योजना’ (एबीएसएस) अंतर्गत विदर्भातील चंद्रपूर, बल्लारपूर, नरखेड, काटोल, सेवाग्राम, धामणगाव, पुलगाव या रेल्वेस्थानकांना विकसित करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने ७६ रेल्वेस्थानकांवर ग्राहक सुविधा सुधारण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानकांना उत्कृष्ट रेल्वेस्थानक म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशभरातील एकूण १२०० पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांसाठी ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्याअंतर्गत मध्य रेल्वेने ७६ स्थानकांवर ग्राहकांच्या सुविधा सुधारण्याचे नियोजन केले आहे. ज्यामध्ये नागपूर रेल्वे विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर : वाघांच्या शिकारप्रकरणी दिल्लीतील सेवानिवृत्त वनाधिकाऱ्याला अटक
या यादीत चंद्रपूर, बल्लारपूरसह नरखेड जंक्शन, आमला, गोधनी, जुन्नर देव, काटोल, बैतूल, सेवाग्राम, धामणगाव, घोराडोंगरी, पुलगाव, मुलताई, पांढुर्णाचा समावेश आहे. विदर्भातील अनेक रेल्वेस्थानकांवर सुविधांचा अभाव आहे. यामुळे अमृत भारत स्टेशन योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात या सर्व रेल्वेस्थानकांचा विकास केला जाणार आहे.