नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण नोंदवलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला नपुंसक म्हटले असा कांगावा जे लोक करताहेत त्यांचे वक्तव्य न्यायालयीन कामकाजाच्या ज्ञानअभावातून येत आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपुरात व्यक्त केली.
फडणवीस म्हणाले, न्यायालयाने एक सामान्य विधान केले आहे. सर्व राज्य सरकारांनी काय केले पाहिजे, असे न्यायालय बोलले आहे. मात्र काही नेते याबद्दल भ्रम पसरवत आहेत. त्यांना न्यायालयीन कारवाई फारशी समजत नाही. संभाजीनगर घटनेला विरोधी पक्षांतील काही नेते राजकीय रंग देत आहेत. हे नेते स्वार्थासाठी राजकीय वक्तव्ये करत आहेत. असे वक्तव्य छोटय़ा बुद्धीने आणि राजकीय सूडबुद्धीने केले जात आहे.
संजय राऊत किंवा अजित पवार यांनी केलेली विधाने मी ऐकली नाहीत, पण संभाजीनगरच्या घटनेवरून शांतता प्रस्थापित करण्याची वेळ असताना विरोधी नेते स्वार्थासाठी वक्तव्ये करत असून हे राज्यासाठी दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
गोंधळ घालणाऱ्यांची जागा महाराष्ट्राबाहेर : बावनकुळे
संभाजीनगर येथे गोंधळ घालणारे लोक घातक आहेत. त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे; ते कुठल्याही समाजाचे असो. अशा घटना झाल्यावर काही विरोधी गटातील राजकीय नेते राजकारण करून समाजाला भडकवण्याचे काम करतात, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.