नागपूर : लोकसभा निवडणुकीत विदर्भातील विविध लोकसभा मतदार संघात पराभव पत्कारावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मुक्काम वाढला असून विदर्भातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपूर वगळता अन्य मतदारसंघात फारशी समाधानकारक कामगिरी भारतीय जनता पक्षाला करता आली नाही. विदर्भात नागपूर आणि अकोला वगळता भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. या पार्श्वभूमीवर भाजपने विदर्भातील विविध मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले की किमान दोन ते तीन दिवस तळ ठोकून बसतात.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका

हेही वाचा…रक्षाबंधनाला, मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या देणार नाही, असे वचन…

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या दक्षिण पश्चिम मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधून भेटीगाठी घेतल्या. फडणवीस गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा नागपुरात आले व दोन ते तीन दिवस नागपुरात थांबले. प्रतापनगर यथील कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्रिमूर्ती नगर येथे सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी दक्षिण, मध्य आणि उत्तर नागपुरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दक्षिण पश्चिम नागपुरातील गणेश मंडळाच्या प्रमुखांची देवगिरी येथे बेठक घेऊन गणेशोत्सव संबंधित सूचना केल्या. देवगिरी आणि धरमपेठेतील निवासस्थानी ते विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात.

हेही वाचा…Nagpur : हवालदाराच्या लेखणीमुळे १,१०० हून अधिक गुन्हेगार गजाआड; राष्ट्रपतींनीही घेतली दखल

चंद्रशेखर बावनकुळे गेल्या आठ दिवसांपासून नागपुरात असून त्यांनी जिल्ह्यात आणि विदर्भातील विविध मतदार संघात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. सावनेरमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीवर जोर दिला. दोन आठवड्यापूर्वी बावनकुळे यांनी भंडारा, गोंदिया, वर्धा ,वाशीम या ठिकाणी मेळावे घेतले. शिवाय कोराडी येथील निवासस्थानी जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील नागरिकांशी भेटी सुरू आहेत. बुथ स्तरावर बांधणी, महिला मोर्चा मजबूत करणे आणि तरुणांची फळी उभी करण्यावर त्यांचा सर्वाधिक भर असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदार संघासह विदर्भातील अन्य मतदार संघात महाविकास आघाडीने मात दिल्याने विधानसभा निवडणुकीत आता विदर्भात जास्तीत जागा जिंकण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. म्हणूनच लोक येणाऱ्या दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपुरात मुक्काम वाढणार असल्याचे दिसून येत आहे.