गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील गावांवर दावा सांगितल्यावरून विधानसभा अधिवेशनात यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु होते. विधानसभा अधिवेशनात कर्नाटक विरोधात ठराव आणण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज ( २७ नोव्हेंबर ) सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला.
कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच आणि इंच जागा महाराष्ट्राचीच आहे. त्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंभीरपणे निर्धाराने व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव आज ( २७ नोव्हेंबर ) दोन्ही सभागृहात मंजूर एकमताने मंजूर करण्यात आला. पण, या ठरावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर झाल्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
विधापरिषदेत ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर एकनाथ खडसेंनी याला ‘मिळमिळीत’ असा उल्लेख केला. एकनाथ खडसे म्हणाले, “सीमाप्रश्नी मंजूर करण्यात आलेला ठराव फार मिळमिळीत आहे. कर्नाटक महाराष्ट्राविरोधात आक्रमकपणे आव्हानात्मक भाषा करत आहे. पण, महाराष्ट्राच्या ठरावामध्ये फक्त तुम्हाला समज देतो, असं सांगितलं आहे,” असा सवाल एकनाथ खडसेंनी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा : “काय बोलताय याचं भान ठेवा,” मिटकरींनी मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानानंतर CM शिंदेंनी खडसावलं
खडसेंनी सवाल उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. “एकतर आपण एकमताने ठराव मंजूर करून परत त्याच्यावर चर्चा करतो. चार गोष्टी तिकडून मांडल्या तर आम्ही ५० गोष्टी बोलू शकतो. आमच्याकडे शब्द नाहीत, असं नाही. तिथे कर्नाटक एक आहे, तर आपलं सभागृह एक होऊ शकत नाही का? काहीतरी गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना खडसावलं आहे.