यवतमाळ : लोकसभेची ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे. पुढील पाच वर्षे देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याची ही निवडणूक आहे. देशाला विकासाच्या दिशेने गतीने नेणाऱ्या नेत्याची निवड करण्याची ही निवडणूक आहे. देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राळेगाव येथे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते आज बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, आ. प्रा. डॉ. अशोक उईके, खा. हेमंत पाटील, उमेदवार राजश्री पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

हेही वाचा…अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कळंब येथील चिंतामणी मंदिर आणि राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील देशातील एकमेव सीतामातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू करू. अयोध्येत रामलल्लाचे मंदिर झाले, इकडे सीतामाईचे मंदिर झाले पाहिजे, काम हाती घ्या, अशा सूचना त्यांनी यावेळी आ. अशोक उईके यांना दिल्या. यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांचा मंदिरांशी फारसा संबंध नसताना ते राम-सीता सोबत का नाही, असा प्रश्न विचारून संदिग्धता निर्माण करू शकतात. अयोध्येतील मंदिराबाबत त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला. मात्र बाल रामलल्लासोबत सीतामाई कशी असेल, हा साधा विचार त्यांच्या मनात आला नाही. हे म्हणजे, माझ्या लहानपणीच्या फोटोत बायको का नाही, म्हणून बायकोने नाराज व्हावे, असा प्रकार असल्याची टीका त्यांनी पवार यांच्यावर केली.

महाविकास आघाडी सोयीचे राजकारण करतात. तिकडे बारामतीत सुनेला बाहेरचे म्हणतात, तर इकडे यवतमाळ-वाशिममध्ये लेकीला बाहेरची म्हणतात, अशी टीका त्यांनी केली. महायुतीच्या येथील उमेदवार राजश्री पाटील यांची सर्व नजर माहेरच्या विकासावर आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी लेकीसारखा सक्षम पर्याय असू शकणार नाही, असे ते म्हणाले. या मतदारसंघात जम्मू-काश्मीरहून आलेल्यांना निवडून दिले. मग घरच्या लेकीला निवडून देणार नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा…अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी

प्रभू श्रीराम, बिरसा मुंडा यांच्या हाती धनुष्यबाण आहे. हाच धनुष्यबाण राजश्री पाटील यांच्या हाती आहे, असे फडणवीस म्हणाले. देशासमोर दोनच पर्याय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन सर्वसमावेशक असून सर्वांच्या बोगी सोबत घेवून विकासाच्या दिशेने सुसाट सुटले आहे. दुसरे इंजिन राहुल गांधी यांचे आहे. या इंजिनाला एकही बोगी नाही. जे आहेत त्यांना सर्वांना इंजिन व्हायचे असल्याने हे इंजिन जागेवरच ठप्प आहे. त्यातही या इंजिनात राहुल गांधींसोबत सोनिया गांधी बसतील, उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे बसतील. त्यात सर्वसामान्यांना बसायलया जागाच मिळणार नाही, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

हेही वाचा…वर्धा : गांधींच्या जिल्ह्यातून गोडसे विचार हद्दपार करा, माजी पालकमंत्री सुनिल केदार म्हणतात, “महात्म्यांचा तिरस्कार…”

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बुडवून काँग्रेससोबत हातमिळवणी केली तेव्हाच निष्ठावान शिवसैनिक दुखावले होते. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने निष्ठावंत शिवसैनिकांना खरी शिवसेना मिळाली. शिंदेच्या शिवसेनेसमोर डुप्लिकेट शिवसेना टिकणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. सभेला महायुतीचे नेते, पदाधिकाऱ्यांसह नगारिकांनी गर्दी केली होती.