लोकसत्‍ता टीम

अमरावती : काही महिन्‍यांपुर्वी कापूस, सोयाबीनचे भाव कोसळलेले असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ

बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महायुती स‍मर्थित युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्‍वासन दिले आहे. सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्‍यांनी सांगितले. व्यासपीठावर गुजरातचे आरोग्‍य मंत्री ऋषिकेश पटेल, खासदार डॉ. अनिल बोंडे, मध्य प्रदेशचे माजी आमदार आत्माराम पटेल, भाजपचे प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, प्रभुदास भिलावेकर, किरण पातूरकर, माजी महापौर किरणताई महल्‍ले आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता. तो आम्‍ही पूर्ण केला. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज पुरविण्‍याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सरकार शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी ही वीज पुरविली जाईल. रात्री शेतावर पाणी देण्यासाठी जाण्याचीही गरज पडणार नाही. दिवसा शेतात काम करीत असतानाच सिंचन करणे शक्य होईल. कारण दिवसा १२ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगळी कंपनीच उभारली असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

शेतीच्‍या विजेसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्‍ट्र हे पहिले राज्‍य आहे. १४ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम सुरू करण्‍यात आले आहे. येत्या १५ ते १८ महिन्यात पूर्ण काम होईल. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज देऊ, अशी ग्‍वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आणखी वाचा-१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

देशातील महिला या अर्थव्‍यवस्‍थेच्‍या आणि समाजव्‍यवस्‍थेच्‍या केंद्रस्‍थानी याव्‍यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणल्‍या. ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळाला. आम्‍ही आगामी काळात राज्‍यात १ कोटी महिलांना लखपती करणार, असे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

Story img Loader