लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : काही महिन्यांपुर्वी कापूस, सोयाबीनचे भाव कोसळलेले असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महायुती समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले आहे. सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल, खासदार डॉ. अनिल बोंडे, मध्य प्रदेशचे माजी आमदार आत्माराम पटेल, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, प्रभुदास भिलावेकर, किरण पातूरकर, माजी महापौर किरणताई महल्ले आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता. तो आम्ही पूर्ण केला. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज पुरविण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सरकार शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी ही वीज पुरविली जाईल. रात्री शेतावर पाणी देण्यासाठी जाण्याचीही गरज पडणार नाही. दिवसा शेतात काम करीत असतानाच सिंचन करणे शक्य होईल. कारण दिवसा १२ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगळी कंपनीच उभारली असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
शेतीच्या विजेसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. १४ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या १५ ते १८ महिन्यात पूर्ण काम होईल. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज देऊ, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आणखी वाचा-१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
देशातील महिला या अर्थव्यवस्थेच्या आणि समाजव्यवस्थेच्या केंद्रस्थानी याव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणल्या. ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळाला. आम्ही आगामी काळात राज्यात १ कोटी महिलांना लखपती करणार, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.