नागपूर : विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नो्व्हेंबरला जाहीर झाले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. सर्वात आघाडीवर नाव होते ते देवेंद्र फडणवीस यांचे.मात्र याबाबत अधिकृत घोषणा होण्यास एक आठवड्याहून अधिक विलंब झाला. तर्क वितर्क सुरू झाले. नेमक्या याच काळात फडणवीस यांच्या नागपूर शहरात पाठमोरा फोटो असलेलेल शेकडो फलक शहराच्या विविध भागात लागले होते. त्यात लिहिले होते. मी पुन्हा येणार आणि ते खरेच ठरले. ते पुन्हा आले. तो पाठमोरा फोटो होता देवेंद्र फडणवीस यांचा. ते उद्या मुख्यमत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

२०१४ ते २०१९ असा पाच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात फडणवीस यांनी भाषण करताना ‘ मी पुन्हा येईन’ ही कविता सादर केली होती. तेव्हा पासून हा शब्द त्यांना चिटकला. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-सेना युतीला बहुमत मिळाले. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील हे निश्चित होते. मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे त्यांना ‘ पुन्हा येईन’ हा शब्द खरा करून दाखवता आला नाही. त्यानंतरदोन वर्षाने पुन्हा राजकीय उलथापालथ झाली. याही वेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. यावेळी ते पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले होते.

New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, “२०१९ ला जनतेने जो कौल दिला होता त्याच्याशी बेईमानी…”
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Devendra Fadnavis new Chief Minister of Maharashtra
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”

हेही वाचा…फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानापुढे जल्लोष

त्यांच्या नशीबाने साथ दिली व भाजपला तब्बल१३२ जागा मिळाल्या व महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झाली. मध्ये काळजीवाहू मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचे आजारपण (रुसवा) आले. या काळात पुन्हा फडणवी हेचमुख्यमंत्री होणार की पक्षश्रेष्ठी अन्य नावाचा विचार करणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या नागपूर या जन्मभूमीत मात्र ‘ ते पुन्हा येतील’, ‘ ते पुन्हा येणार’, अशा आशयाचे फलक विविध ठइकाणी लागले होते. यावर फडणवीस यांचा पाठमोरा फोटो होता. त्यामुळे शंका होती. मात्र बुधवारी फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी अधिकृतपणे निवड झाली. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचा गट नेताच मुख्यमंत्री होतो त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यामुळे नागपुरात लागलेल्या त्या फोटोचे रहस्य नागपूरकराना फडणवीस यांच्या निवडीनंतर उलगडले. ते अखेल आलेच मुख्यमंत्री म्हणून.

Story img Loader