नागपूर: नागपूरकर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) झाला. जन्म झालेल्या रुग्णालयाबाबत फडणवीस काय म्हणाले आपण बघूया. मेडिकलमधील १८२ कोटी खर्चाच्या सोमवारी झालेल्या विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, माझी जन्मभूमी, कर्मभूमी नागपूर आहे. यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे. माझा जन्म मेडिकलमधील आहे. यामुळे जन्मभूमिच्या कर्जातून उतराई प्रत्येकालाच व्हावे लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हीच जबाबदारी मेडिकलच्या विकास करून मी पार पाडीत आहे. मनुष्यबळ असो की, इन्फ्रास्ट्रक्चर या त्रृटी असतील, परंतु यावर मात करून मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवेचा दर्जा सुधारणे ही गरज आहे. उपचाराचा दर्जा वाढवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. १८२ कोटीचे भूमिपूजन झाले तसेच १४२ कोटीतून होणाऱ्या २९ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच ८ आयसीयूच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच ती कामे सुरु होतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis birth in medical the government hospital mnb 82 ysh