नागपूर शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया व व्यवस्थापन या संदर्भातील प्रकल्प नागपूरमध्ये नेदरलँडची कंपनी सुरू करणार आहे. यासंदर्भात रविवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नागपुरात होणारा हा अशाप्रकारचा देशातील पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प असेल, असा दावा करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नागपूर : ‘पदवी आयुर्वेदाची असेल तर उपचार ॲलोपॅथीचे नको’; नितीन गडकरींचा डॉक्टरांना सल्ला

महाराष्ट्रातून विशेषत: नागपूरमध्ये येण्याची शक्यता असणारे काही प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने नागपूरकरांसह वैदर्भीयांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील घनकचऱ्यांच्या संदर्भातील मोठ्या प्रकल्पाची घोषणा फडणवीस यांच्याकडून करण्यात आली. रविवारी फडणवीस यांनी नेदरलँड येथील एसयूएसबीडीई (सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेन्ट) कंपनीचे अध्यक्ष जॉप व्हीनेनबॉस यांच्यासह आमदार प्रवीण दटके महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी कंपनीसोबत करार करण्यात आला.

हेही वाचा- नागपूर : ‘पोलीस भरतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज भरण्याची संधी द्या’; युवक-युवतींचे धरणे आंदोलन

नागपूर शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला एकही रुपया खर्च येणार नाही. नेदरलँड येथील एसयूएसबीडीई कंपनी स्वतःच हा प्रकल्प स्वखर्चाने उभा करेल व त्यांचे संचालन करेल. त्याची देखभाल दुरुस्तीही कंपनी करणार आहे. कालबद्ध मर्यादेत हा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले व एका वर्षात प्रकल्प सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा- ‘पोलीस भरतीतील जाचक अट रद्द करा’; गोपीचंद पडळकरांची फडणवीस यांच्याकडे मागणी

वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया

या प्रकल्पात जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यातून अक्षय ऊर्जा निर्मिती, बायो सीएनजी, बायोगॅस, खते आणि पुनर्वापर करता येणारी उत्पादने तयार केली जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis claim to the countrys first innovative solid waste management project in nagpur dpj