नागपूर: हिवाळी अधिवेशन सुरू असताना मंगळवारी भाजप आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर नेते मंत्री उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे स्थान आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या शिवाय अनेक मुद्यावर भाष्य केले. आज सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे एक पुस्तक आमदारांना भेट देण्यात आले. भविष्यातला भारत कसा असेल याचा वेध घेणारे हे पुस्तक असून सर्वांनी ते वाचावे आणि पुढे त्या दिशेने काम करावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: नागपूर: १० वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

आज मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर ठराव मांडतील व तो एकमताने तो ठराव मंजूर होईल काल बोलणाऱ्यांचे ( उद्धव ठाकरे ) मला आश्चर्य वाटले.. केंद्रशासित प्रदेश करा ही मागणी त्यांनी केली.करण्यासाठी कोणी काहीही मागणी करू शकतो… परंतु एवढे वर्ष हे का झालं नाही याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: पळून जाऊन लग्न केले, पत्नीचे पुन्हा एका युवकावर प्रेम जडले; पतीला कुणकुण लागताच…

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मागितला जात आहे . त्यावर फडणवीस म्हणाले विरोधकांची ही रणनीती आहे. कुठलेही प्रकरण काढायचं आणि त्यावर गोंधळ घालायचा. मात्र उत्तर घ्यायचे नाही अशा पद्धतीचा त्यांचे धोरण आहे. ज्याला ते बॉम्ब म्हणत होते ते लवंगी फटाके ही नाही. आमच्याजवळ ही भरपूर बॉम्ब आहे… मात्र ते केव्हा काढायचे हे आम्ही ठरवू मात्र सध्या तरी यांचे लवंगी फटाके आम्ही पाहू असेही फडणवीस म्हणाले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis commented on several important issues when thebjp mla visited the rss headquarters nagpur vmb 67 tmb 01