नागपूर: नागपूरच्या इतिहासात प्रथमच नागपूरकर ओजस देवतळे याने आशियाई क्रीडास्पर्थेत तीन सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला. ओजस हा आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच नागपूरकर आहे. सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजसच्या गणेश नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्याचे अभिनंदन केले.
ओजसने सुवर्ण पदक जिंकल्यावर फडणवीस यांनी त्यांच्या पालकांचे दूरध्वनीवरुन अभिनंदन केले होते. आता त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी ओजस व त्याचे कोचसोबत देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. ओजसने शहरात आर्चरीसाठी एक मोठे स्टेडियम व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आगामी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ओजसला शुभेच्छा देत जी काही मदत लागेल ती सरकारकडून केली जाईल ,असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.