लोकसत्ता टीम

नागपूर : संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आमचे प्रवक्ते बोलतील. माझ्या स्तराचे लोक असतील त्यांच्याबाबत मला प्रश्न विचारा. त्यावर मी बोलणार, मात्र संजय राऊतांसारख्या लोकांना मी उत्तर देत नाही आणि त्यांच्याबाबत मला विचारतही जाऊ नका. त्यांचा महायुती व भाजपवर टीका करणे, तेवढाच एकमेव कार्यक्रम असून त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी केली.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत दररोज सकाळी काहीना काही वक्तव्य करीत असतात. त्यांच्यावर बोलण्यासाठी भाजपने प्रवक्त्याची नियुक्ती केली असून ते त्याला उत्तर देत असतात. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देत नाही आणि त्यावर बोलणेही मी उचित मानत नाही. माझ्या उंचीचे ते नाही. माझ्या स्तराचे लोक जर माझ्यावर टीका करत असेल तर त्यावर प्रतिक्रिया देईल, मात्र संजय राऊत यांच्यावर बोलण्यासाठी आम्ही प्रवक्ते ठेवले आहेत, ते त्यांना उत्तर देतात. त्यामुळे मी वारंवार सांगतो की संजय राऊतांबद्दल मला काहीही विचारू नका, असेही फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”

अजित पवार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काय बोलले, त्याबाबत माहिती नाही. मात्र त्यांच्या नावावर कोणी काही बोलून टीका करून त्यांना बदनाम करत असतात. त्यामुळे ते जे बोलले नाही, त्यावर विरोधकांकडून काहीही बोलले जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचार सभेमध्ये शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी असल्याचे वक्तव्य केले असले तरी काही लोक त्यावर जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. विरोधकांना सध्या महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्यावरुन टीका करण्यासाठी ठेवले आहे का, असा प्रश्न पडतो. या विषयावर राजकारण करणे योग्य नाही. मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा-१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

देवेंद्र फडणवीस सध्या राज्याच्या विविध भागात महायुतीमधील उमेदवारासाठी सभा घेत असताना शुक्रवारी रात्री त्यांनी पश्चिम, उत्तर आणि मध्य नागपुरात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असताना दक्षिण पश्चिम मतदार संघातून ते स्वत: निवडणूक लढवत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी दक्षिण पश्चिमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना प्रचाराबाबत सूचना केल्या.

Story img Loader