लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अल्पसंख्याकांची मते मिळणार नाहीत, या भीतीने उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद केले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी मंगळवारी दक्षिण-पश्चिम मतदारसंघात प्रचार मिरवणूक काढली. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, मला देखील याचं दुःख आहे. ज्यांना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे त्यांना केवळ अल्पसंख्याकाची मते मिळावी म्हणून हिंदुरुदय सम्राट नाव लावणे ठाकरे यांनी सोडून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आदरणीय आहे. महाविकास आघाडीमध्ये आता हिंदूहृदय सम्राट म्हटले तर आपल्याला अल्पसंख्याकांची मते मिळणार नाही, अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे त्यांनी आता जाहीर भाषणातून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणे बंद केले आहे, असे फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा-पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…

स्वतःवर होणा-या टिकेबाबत ते म्हणाले, “माझ्यापासून कोणाला तरी धोका वाटत असेल, ल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे. मात्र जनता माझी शक्ती आहे. राज ठाकरे यांनी धनुष्यबाण ही कोणाची प्रॉपर्टी नसल्याची टीका केली आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले. कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह कोणाचीही मालमत्ता नाही. धनुष्यबाण अधिकृतपणे शिंदेंना मिळाले आहे. महाविकास आघाडी हे विभाजित घर आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधानाविषयी पसरवलेला भ्रम आता दूर झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नाटक जनता आता चालू देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

दक्षिण पश्चिम मतदार संघाने मला तीन वेळा निवडून दिले आहे. आजही लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. माझा मतदार संघा हा माझा परिवार आहे परिवाराचे लोकांचे माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे ते निश्चित निवडून देतील असेही फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा-नवनीत राणांकडून पुन्‍हा १५ सेकंदाचा उल्‍लेख; म्‍हणाल्‍या, आवेसींना…

मतदारसंघात मी कमीत कमी वेळ देऊ शकणार आहे. मात्र जो काही वेळ असेल त्यामध्ये मी लोकांचा आशीर्वाद घेत आहे. माझ्या मतदारसंघातील जनता समजदार आहे. ज्या नेत्याला निवडून देतो तो महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व करतो. त्यामुळे ते जनता माझ्यासोबत असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. मी आणि अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. आमच सरकार योग्य काम करत आहे. जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल असेही ते म्हणाले.