लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असलेली निराशा त्यांच्या भाषणातील टीकेतून दिसत आहे. मी नागपुरी असल्यामुळे मला त्याच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येत. पण मला ते शोभत नाही. अनुभवी राजकारणी तसे बोलत नसतात. मात्र ते बोलत असल्यामुळे त्यांची राजकारणी म्हणून पातळी घसरली, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केली.

फडणवीस मंगळवारी दुपारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणातून शिवराळ भाषा बोलत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, जनता त्यांना जवळ करणार नाही. मुंबईमधील तीन जागा भाजप आणि तीन जागा शिवसेनेने लढायच्या असे, पूर्वीपासून ठरले होत. सुरुवातीला दक्षिण मुंबईची जागा आम्ही लढावी म्हणून आम्ही तयारी देखील होतो.असेही फडणवीस म्हणाले.  

आणखी वाचा-अमरावती : पोलिसांच्‍या हातावर तुरी देऊन कैद्याचे रुग्‍णालयातून पलायन

नारायण राणे हे शिवसेनेच्या जास्त जवळ होते. त्या काळात आम्ही तिथे नव्हतो. त्यामुळे राणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची जास्त माहिती आहे. त्यांना आलेले अनुभव ते मांडत असतात. त्या आधारावर उद्धव ठाकरेबांबत बोलले असतील.

माझ्या मागे मोदी होते म्हणून..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे. पाच वर्षात मला महाराष्ट्रात जनतेने स्वीकारले. माझ्या पाठीमागे खंबीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे होते. म्हणून मी हे करू शकलो. त्यासाठी मी त्यांचा आभारी असल्याचे फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticized uddhav thackeray in nagpur vmb 67 mrj