कुठलाही प्रकल्प राज्याबाहेर गेला म्हणजे आमच्या नावाने कांगावा करणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे छायाचित्र छापणे हे तात्काळ बंद केले पाहिजे. जे उद्योग व प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले ते महाविकास आघाडी सरकारमुळे गेले, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस शनिवारी नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘चित्रा नव्हे, त्या तर ‘विचित्र ताई’! यशोमती ठाकूर यांची शेलकी टीका

ऊर्जा उपकरण निमिर्ती प्रकल्पा संदर्भातील सगळी टाईमलाईन ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहे. केंद्र सरकारने अशा पद्धतीचे तीन पार्क करण्याचे ठरवले आहे. त्यातील एक पार्क दिलेला आहे आणि दोन पार्क लवकरच महाराष्ट्राला मिळतील. केंद्र सरकार असे प्रकल्प तयार करत असते तेव्हा सगळ्या राज्यांकडून निविदा मागवल्या जात असतात. त्यामध्ये काही राज्यांना प्रकल्प मिळतो. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असा कांगावा करणे चुकीचे आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

यासोबतच जे अधिकारी महाराष्ट्रात उद्योग यावा म्हणून पाठपुराव्यासाठी प्रयत्न करतात, त्यांचाही उत्साह मावळतो. जितेंद्र आव्हाड यांची एखाद्या गोष्टीचा कांगावा करण्याची एक पद्धत आहे. मुळात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन चित्रपटगृहात जाऊन जो तमाशा केला त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली. इतर कोणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेतला असता तरी हीच कारवाई झाली असती. आपण काहीतरी खूप मोठे केले, असे दाखवण्याचा जो त्यांचा नाद आहे त्या नादातून या सगळ्या गोष्टी घडत असल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- नागपूर: कठडे तोडून गाठले गडकरींचे कार्यालय!; विदर्भवाद्यांचा आक्रमक पवित्रा

ज्यांना गुजरातची माहिती आहे त्यांना कळते की संपूर्ण गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाग आहे. तिथे भाजपाचा अभूतपूर्व विजय होईल. या निवडणुकीसाठी पक्षाने जी जबाबदारी दिली ती तिथे जाऊन पूर्ण करायची आहे. या निमित्ताने गुजरातमध्ये काम करण्याची संधी मला पक्षाने दिली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticizes mahavikas aghadi over the project that went outside the state dpj
Show comments