लोकसत्ता टीम
नागपूर : मुंबई महापालिका पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. शिवाय गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले एक तरी काम दाखवावे. तोडांच्या वाफा काढण्याशिवाय त्यांना काही जमत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला सकाळी टेकडी मार्गावरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या सभेत केवळ टोमणे आणि टीका याच्या पलिकडे काही राहत नाही. ते विकासावर काहीच बोलत नाही. त्यांचे भाषण ठरलेले असून जसेच्या तसे मी म्हणून दाखवतो ,असा टोला फडणवीस यांनी लगावला. शरद पवार आता निराशेतून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करु लागले आहेत.
आणखी वाचा-‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…
जेव्हा मोदींवर टीका केली जाते किंवा त्यांना शिव्या दिल्या जातात. तेव्हा लोक त्यांचा जयजयकार करतात. शरद पवार यांनी टीका करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केले हे लोकांना सांगितले पाहिजे मात्र त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काहीच नाही असेही फडणवीस म्हणाले. बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात. देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आणि आमच्यासाठी बुद्धी आणि आमच्या विरोधकांना सुबुध्दी द्यावी असेही फडणवीस म्हणाले.