लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजवरचा इतिहास बघितला तर त्यांनी कोणताही प्रकल्प पूर्ण केला नाही. उलट प्रकल्प थांबविणे, विकास कामे थांबविणे व बंद पाडणे हा त्यांचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे जनता कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारला निवडून देणार नाही, असा दावा भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थानिक भाजपचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारसभेसाठी चंद्रपुरात आले होते. यावेळी फडणवीस यांनी जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या अम्माला श्रद्धांजली अर्पण केली. तसेच माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार आल्यास धारवीमधील विकास प्रकल्प बंद करू असे आश्वासन दिले आहे. यावर भाष्य करतांना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा आजवरचा इतिहास हा प्रकल्प थांबविण्याचा आहे. त्यामुळे जनता त्यांना थारा देणार नाही. धारावीमध्ये गरिबांना घर घेण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवू आणि गरिबाचे नंदनवन अशा पध्दतीने धारावीचा विकास करू. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह भाजप नेते तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व अन्य उपस्थित होते.

आणखी वाचा-अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

पासेस न दिल्याने महिला कार्यकर्त्यांची नारेबाजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे पास भाजपच्या अनेक माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, महिला पदाधिकारी तथा इतर पदाधिकाऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे भाजपच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सभास्थळाबाहेर माजी नगर सेवक अजय सरकार यांनी शेकडो महिलांसह नारेबाजी केली. असला प्रकार खपवून घेणार नाही. हा आमचा अपनमान आहे. सभेला बोलवता तर पास द्या, सन्मानाने बसण्याची व्यवस्था करा, अशा पद्धतीने सभेला जाण्यापासून अटकाव करू नका, अन्यथा असा इशारा देखील दिला. .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticizes uddhav thackeray says obstruction of projects so people will not support him rsj 74 mrj