नागपूर : दिल्लीत नवीन सरकार सत्तारुढ होण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या असताना गुरुवारी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून नागपुरात दाखल झाले व त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले. फडणवीस यांनी अलीकडेच ‘मला सरकारमधून मोकळे करा’ अशी विनंती भाजपश्रेष्ठींकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता विकास वर्ग सुरू आहेत. त्यानिमित्त देशभरातील संघाचे पदाधिकारी येथे आले आहेत. देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी नागपुरात आले. धरमपेठ येथील निवासस्थानी गेले. तेथे काही वेळातच संघाचे तीन राष्ट्रीय पातळीवरचे संघाचे पदाधिकारी आले. त्यांनी जवळपास दीड तास फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले.

हेही वाचा – नागपूर लोकसभा निवडणूकीत बसपच्या मतांमध्ये घट, सलग चौथ्या निवडणूकीत…

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीला पोहोचले. मात्र फडणवीस निकालानंतर दोन दिवसांनी नागपुरात आले आणि ते चार तास थांबून दिल्लीला रवाना झाले. ते संघाचा संदेश घेऊन दिल्लीला गेले अशी चर्चा आहे. मात्र याबाबत भाजप व संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला याबाबत काही माहिती नसल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मिळालेले अपयश बघता फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी आपल्यावर घेऊन त्यांनी मला सरकारमधून मोकळे करा अशी विनंती पक्षातील वरिष्ठाकडे केल्यानंतर फडणवीस यांच्या समर्थकामध्ये अस्वस्था निर्माण झाली. त्यानंतर लगेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित मुंबईला बैठक घेऊन फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती केली. फडणवीस यांच्या निर्णयाचे पडसाद त्यांच्या समर्थकामध्ये आणि संघ स्वयंसेवकामध्ये उमटले आणि अनेकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – मोसमी पावसाचे आगमन, की नुसतीच घाई..!

फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्यासंदर्भात असा कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती केली. शाखांमध्ये संघ स्वयंसेवकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली असून फडणवीस यांनी असा कुठलाही निर्णय घेताना संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशी सूचना काहींनी केली. मात्र फडणवीस गुरुवारी नागपुरात आल्यानंतर संघाचे पदाधिकारी त्यांना भेटायला आले आणि त्यांच्यासोबत दीड तास चर्चा केली. गेल्या काही वर्षात संघाचे पदाधिकारी कुठल्याच भाजप नेत्यांना भेटायला येत नाही तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपचे भेटायला जातात मात्र फडणवीस यांची संघ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीची आज नागपूरसह राज्यात चांगलीच चर्चा होती. दरम्यान दिल्लीला जाण्यापूर्वी फडणवीस यांनी स्थानिक आमदार आणि काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना सूचना करुन लवकरच नागपुरात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis discussion with rss office bearers in nagpur vmb 67 ssb
Show comments